कार्यकर्ता संवाद--महिलांचा राजकारणातील सहभाग


या विधानसभा निवडणुकांच्या मोसमामध्ये बीजेपी नेत्यांनी कार्यकर्ता-कर्ताधर्ता नावाची मोहीम सुरू केलेली आहे या मोहिमेचा प्रमुख उद्देश पक्षाला बळकटी देणाऱ्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करणे हा आहे, तसेच ही मोहीम शिवाजी महाराज यांच्या विचार धारणेतून आणि नेतृत्व शैलीतून साकार झालेली आहे. महान राजे छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या कार्यकर्ते म्हणजे मावळ्यांना त्यांच्या नियोजन आणि कामाच्या पद्धतीमध्ये सहभागी करत असतात. या सर्वसमावेशक दृष्टिकोनामुळे शिवाजी महाराजांना मावळ्यांचा स्वराज्य प्राप्ती आणि रक्षणासाठी नेहमीच मोठा आधार झाला.

सर्व बीजेपी नेत्यांनी कार्यकर्ता-कर्ताधर्ता मोहीम सुरू केलेली आहे आणि या मोहिमेला खूप मोठ्या प्रमाणात सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसत आहे. माननीय महसूल मंत्री आणि बीजेपी अध्यक्ष महाराष्ट्र, श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी यासंदर्भात विविध व्हिडीओज ट्विटरवर पोस्ट केलेले आहेत ज्यामध्ये ते प्रामुख्याने पक्षाच्या कार्यकर्त्यांची भूमिका, महत्व, आणि अपेक्षा याविषयी भाष्य करतात.
श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी नुकताच एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे, ज्यामध्ये ते राजकारणातील महिलांचा सहभाग आणि त्याविषयीचे विविध मुद्दे स्पष्टपणे मांडताना दिसतात. या व्हिडिओमध्ये श्री चंद्रकांत दादा पाटील म्हणतात की आजकाल सर्वच क्षेत्रांमध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय झालेला आहे, परंतु जेव्हा राजकारणाची गोष्ट येते तेव्हा महिला कार्यकर्ते आणि नेत्यांचा सहभाग फक्त निवडणुकांत पुरताच दिसून येतो. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 33 टक्के आरक्षण उपलब्ध झालेले आहे, तरीही महिलांचा सहभाग राजकारणामध्ये समाधानकारक दिसून येत नाही आणि ही गोष्ट बदलण्याची वेळ आलेली आहे. हे करण्यासाठी राजकारणातील पुरुषांची भूमिका बदलावी लागेल. याकरिता त्यांना महिला कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करणे तसेच महिला कार्यकर्त्यांवरील जबाबदारीही वाढवावी लागेल. थोडक्यात काय तर राजकारणातील पुरुषांची भूमिका ही विश्वासार्ह, मार्गदर्शनपर आणि प्रोत्साहनपर राहिली तर महिला कार्यकर्त्यांचा सहभाग राजकारणामध्ये निश्चितच वाढेल.
श्री चंद्रकांत पाटील पुढे म्हणतात की स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना आरक्षण मिळाले आहे तरीही महिलांचा सहभाग लक्षणीय दिसून येत नाही. परंतु भविष्यात विधानसभा आणि लोकसभेमध्ये देखील  अशा प्रकारचे आरक्षण महिलांना लागू होऊ शकते. अशावेळी जर राजकारणात सहभागी होणाऱ्या महिला सक्षम नसतील किंवा देशाच्या उद्दिष्टे आणि धोरणांविषयी  दिशाहीन असतील तर त्यांचे योगदान देशाच्या विकासामध्ये नगण्य राहील. श्री पाटील यांच्या मते अशी वेळ येऊ नये आणि यासाठी महिलांचा राजकारणातील सहभाग योग्य मार्गदर्शन आणि प्रोत्साहन याद्वारे वाढवणे गरजेचे आहे. तसेच श्री पाटील यांना वाटते की जर प्रत्येक क्षेत्रांमध्ये महिला अग्रेसर आहेत तर फक्त राजकारणामध्ये अशी स्थिती का...
श्री पाटील व्हिडिओच्या शेवटी म्हणतात की महिलांचे योगदान राजकारणामध्ये वाढवले पाहिजे आणि काळजी घेतली पाहिजे की याद्वारे लाभणारी नेतृत्वशैली ही ध्येयपूर्ण आणि देशाच्या धोरणे आणि उद्दिष्टांच्या दृष्टीने सकारात्मक असेल.
कार्यकर्ता संवाद या कार्यकर्ता-कर्ताधर्ता मोहिमेअंतर्गत श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी महिलांचा राजकारणातील सहभाग या विषयावर त्यांचे विचार व्यक्त केलेले आहेत. तसेच त्यांनी महिलांचा राजकारणातील सहभाग फक्त निवडणुकांपुरताच दिसतो या महत्त्वाच्या मुद्द्यावर भाष्य केलेले आहे. श्री पाटील यांचा दृष्टिकोन ज्याद्वारे महिलांचा राजकारणातील सहभाग वाढवला जावा आणि नेतृत्वशैली सक्षम आणि ध्येयपूर्ण असावी ज्याद्वारे देशाचा विकास साधता येईल ही अत्यंत स्तुत्य आहे. आशा आहे की, भविष्यात आपल्याला महिलांचा राजकारणातील सक्रिय आणि सक्षम सहभाग वाढलेला पहायला मिळेल.

Comments

Popular posts from this blog

Auto-Rickshaw Journey in Election Campaign

Dussehra Festival Special—8th October 2019

New Inning—A Great Beginning