Posts

Showing posts from September, 2019

शेतकरी सन्मान भवनाचे भूमिपूजन

Image
कृषी मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी नुकतेच कोल्हापूर येथे शेतकरी सन्मान भवनाचे भूमिपूजन केले . या प्रकल्पानुसार कृषी विभागाची सर्व कार्यालये एका कॅम्पसमध्ये एकछत्री शेतकरी सन्मान भवन या इमारतीत येणार आहेत . या प्रकल्पामुळे 52 लाख रुपये इतक्या मोठ्या रकमेची बचत कृषी विभागाच्या बजेटमध्ये होणार आहे . या इमारतीतील   कार्यालये येत्या एक ते दोन वर्षात सुरळीतपणे सुरू होतील असा अंदाज आहे . माननीय कृषिमंत्री श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी माहिती   दिली की शेतकरी सन्मान भवनामुळे शेतकऱ्यांच्या सुविधांमध्ये वाढ होईल आणि सुखद रीतीने कामकाज पार पाडण्यासाठी शेतकऱ्यांना मदत होईल . आत्तापर्यंत कोल्हापूर शहरामध्ये कृषी विभागाची कार्यालये विविध ठिकाणी असून या ठिकाणी काम करणे हे अत्यंत अवघड जात होते . परंतु शेतकरी सन्मान भवन या प्रकल्पामुळे सर्व कृषी विभागाची कार्यालये एकाच छताखाली येतील . या प्रकल्पासाठी 29 करोड 80 लाख रुपये निधीची   उपलब्धता करण्यात आलेली असून कृषी महाविद्यालया

शासन निर्णय आणि योजनांची प्रशंसा

Image
महाराष्ट्रामध्ये 21 ऑक्टोबरला राज्याच्या निवडणुका जाहीर   झालेल्या आहेत आणि महाराष्ट्रातील सर्व राजकीय नेते सध्या निवडणूक मोहिमांमध्ये व्यस्त आहेत . बीजेपी नेत्यांनीही महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून विविध कार्यकर्ते आणि मतदारांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला . सध्या सोशल मीडिया , प्रिंट मीडिया अशा सर्वच मीडियाचा वापर राजकीय नेते त्यांच्या वोट बँकपर्यंत पोहोचण्यासाठी करीत आहेत . महाराष्ट्र बीजेपी अध्यक्ष श्री चंद्रकांत दादा पाटील हेदेखील त्यांच्या ट्विटर अकाउंटचा उपयोग राज्य सरकारच्या विविध योजना आणि निर्णय लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी करताना दिसतात . ट्विटर हा सोशल मीडियाचा नेहमीच एक उत्कृष्ट पर्याय असून राजकीय नेत्यांना जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी ट्विटर हा सर्वोत्कृष्ट पर्याय ठरतो . माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील हे त्यांच्या ट्वीटर   अकाउंटचा उपयोग राज्य सरकारच्या विविध योजना , निर्णय , आणि कार्ये इत्यादी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी करताना नेहमीच दिसतात . नुकती