शेतकरी सन्मान भवनाचे भूमिपूजन


कृषी मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी नुकतेच कोल्हापूर येथे शेतकरी सन्मान भवनाचे भूमिपूजन केले. या प्रकल्पानुसार कृषी विभागाची सर्व कार्यालये एका कॅम्पसमध्ये एकछत्री शेतकरी सन्मान भवन या इमारतीत येणार आहेत. या प्रकल्पामुळे 52 लाख रुपये इतक्या मोठ्या रकमेची बचत कृषी विभागाच्या बजेटमध्ये होणार आहे. या इमारतीतील  कार्यालये येत्या एक ते दोन वर्षात सुरळीतपणे सुरू होतील असा अंदाज आहे.

माननीय कृषिमंत्री श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी माहिती  दिली की शेतकरी सन्मान भवनामुळे शेतकऱ्यांच्या सुविधांमध्ये वाढ होईल आणि सुखद रीतीने कामकाज पार पाडण्यासाठी शेतकऱ्यांना मदत होईल. आत्तापर्यंत कोल्हापूर शहरामध्ये कृषी विभागाची कार्यालये विविध ठिकाणी असून या ठिकाणी काम करणे हे अत्यंत अवघड जात होते. परंतु शेतकरी सन्मान भवन या प्रकल्पामुळे सर्व कृषी विभागाची कार्यालये एकाच छताखाली येतील. या प्रकल्पासाठी 29 करोड 80 लाख रुपये निधीची  उपलब्धता करण्यात आलेली असून कृषी महाविद्यालयाने तीन एकर जागेची उपलब्धता ही या प्रकल्पासाठी करून दिलेली आहे. राज्य सरकार हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहे जेणेकरून येथील कार्यालय येत्या एक ते दोन वर्षात सुरू होतील.  
माननीय कृषिमंत्री श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी माहिती दिली की राहुरी कृषी विद्यापिठाप्रमाणे या कृषी भवनामध्ये शेतकऱ्यांना संशोधन,बियाणे, खते इत्यादींविषयी माहिती आणि विक्रीची सुविधा उपलब्ध राहील. वर्षभरामध्ये येथे 600 दुकानांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अधिक चांगल्या मार्केटिंग प्लॅटफॉर्मची सोयही येथे केली जाईल. माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील यांना या अभिनव प्रकल्पाच्या भूमिपूजनाचा सन्मान लाभला असून लवकरच हा प्रकल्प कार्यान्वित होणार आहे.  
या कार्यक्रमाला कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार श्री धैर्यशील माने, आमदार श्री अमल महाडिक, जिल्हाधिकारी श्री दौलत देसाई, रहिवासी जिल्हाधिकारी श्री संजय शिंदे, विभागीय कृषी उपसंचालक श्री दशरथ  तांबळे, कृषी अधिकारी उमेश पाटील आणि डॉ गजानन खोत उपस्थित होते.
महाराष्ट्र कृषी विभागाने एकात्मिक कृषि भवनाच्या माध्यमातून सर्व कृषी कार्यालय एका छताखाली आणून एका अभिनव प्रकल्पाची सुरुवात केलेली आहे. माननीय महसूलमंत्री श्री चंद्रकांत पाटील हे या प्रकल्पाचे शिल्पकार आहेत. या प्रकल्पाचा फायदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्यांच्या कृषी संबंधित कामांमध्ये सोईस्करपणा आणि सुखद अनुभवाच्या माध्यमातून मिळणार आहे. या प्रकल्पाद्वारे शेतकऱ्यांना विक्रीची सुविधा उपलब्ध केल्यामुळे एका चांगल्या मार्केटिंग प्लॅटफॉर्मचीही सोय झालेली आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून शेती संदर्भातील संशोधनपर कृतीनाही पोषक वातावरण तयार होईल आणि याचा फायदा ही आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रक्रिया कृषी क्षेत्रामध्ये वापरण्याच्या दृष्टीने होईल. या अभिनव प्रकल्पाद्वारे कृषी विभागाच्या वार्षिक बजेटमध्येही बचत होणार आहे, कारण या प्रकल्पामुळे स्वतःची जागा कृषी विभागाच्या कार्यालयांसाठी उपलब्ध होणार आहे. हा प्रकल्प अत्यंत प्रशंसनीय असून अशा प्रकारच्या प्रकल्पांचा विचार अन्य विभागांना ही निश्चितच उपयुक्त ठरेल. माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील हे नेहमीच राज्यातील शेतकऱ्यांसाठी सजग असतात आणि या प्रकल्पाच्या माध्यमातून त्यांची शेतकऱ्यांप्रति असणारी काळजी आणि जबाबदारीची जाणीव पुन्हा एकदा स्पष्ट झाली आहे.

Comments

Popular posts from this blog

First Melava at Kothrud for the Election

New Inning—A Great Beginning

Vidhan Sabha Election Planning