ब्राह्मण महासंघाचा निवडणुकीसाठी पाठिंबा
आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये बीजेपी ने विरोधी पक्ष आणि मतदार यांना चंद्रकांत दादा पाटील महाराष्ट्र राज्य महसूल मंत्री यांना कोथरूड पुण्यामधून तिकीट देऊन एक आश्चर्याचा धक्का दिलेला आहे. बीजेपीच्या अचानक घेतल्या गेलेल्या या आश्चर्यकारक निर्णयामुळे अनेक चर्चा रंगल्या होत्या . लोकांनी कोल्हापूरचा उमेदवार आम्हाला नको अशाप्रकारे टीकेचा सूरही लावला होता परंतु श्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या चांगल्या लोक संबंधांमुळे तसेच प्रभावी नेतृत्वामुळे ही टीका आता सकारात्मक रीतीने बदलताना दिसत आहे . नुकतेच त्याचे एक उदाहरण ब्राह्मण महासंघाच्या पाठिंब्याच्या स्वरूपात पहायला मिळते. श्री चंद्रकांत दादा पाटील यांची ब्राह्मण महासंघ अधिकाऱ्यांबरोबर नुकतीच एक बैठक झाली , जिला प्राध्यापक मोहिनी पत्की , श्री जितेंद्र कुलकर्णी , श्री आनंद दवे उपस्थित होते . या बैठकीनंतर महासंघाने एक पत्रक जारी केले आहे ज्याद्वारे त्यांनी माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील यांना आपला पाठिंबा दर्शवला आहे...