ब्राह्मण महासंघाचा निवडणुकीसाठी पाठिंबा


आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये बीजेपी ने विरोधी पक्ष आणि मतदार यांना चंद्रकांत दादा पाटील महाराष्ट्र राज्य महसूल मंत्री यांना कोथरूड पुण्यामधून तिकीट देऊन एक आश्चर्याचा धक्का दिलेला आहे. बीजेपीच्या अचानक घेतल्या गेलेल्या  या आश्चर्यकारक निर्णयामुळे अनेक चर्चा रंगल्या होत्या. लोकांनी कोल्हापूरचा उमेदवार आम्हाला नको अशाप्रकारे टीकेचा सूरही लावला होता परंतु श्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या चांगल्या लोक संबंधांमुळे तसेच प्रभावी नेतृत्वामुळे ही टीका आता सकारात्मक रीतीने बदलताना दिसत आहे. नुकतेच त्याचे  एक उदाहरण ब्राह्मण महासंघाच्या पाठिंब्याच्या स्वरूपात पहायला मिळते. 

श्री चंद्रकांत दादा पाटील यांची ब्राह्मण महासंघ अधिकाऱ्यांबरोबर नुकतीच एक बैठक झाली, जिला प्राध्यापक मोहिनी पत्की, श्री जितेंद्र कुलकर्णी, श्री आनंद दवे उपस्थित होते. या बैठकीनंतर महासंघाने एक पत्रक जारी केले आहे ज्याद्वारे त्यांनी माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील यांना आपला पाठिंबा दर्शवला आहे. या बैठकीदरम्यान बीजेपी-शिवसेना युतीचे उमेदवार श्री चंद्रकांत दादा पाटील आणि ब्राह्मण महासंघाचे अधिकारी यांच्यामध्ये ब्राह्मण समाजाच्या विविध समस्या आणि मागण्या याला अनुसरून अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी यावेळी या समाजाच्या नेत्यांना आश्वस्त केले की त्यांच्या समस्या आणि मागण्यांकडे सहानुभूतीपूर्वक पाहिले जाईल आणि नव्या कार्यकाळामध्ये या समाजाच्या हितासाठी प्रयत्न केले जातील.

ब्राह्मण महासंघाने जारी केलेल्या पत्रकामध्ये या सर्व गोष्टी नमूद केलेल्या आहेत तसेच माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे. या पत्रकानुसार या बैठकीमध्ये ब्राह्मण समाजासाठी आर्थिक विकास महामंडळाची स्थापना, तसेच ब्राह्मण समाजातील विद्यार्थ्यांच्या समस्या अशा विविध मागण्यांचा उल्लेख केलेला आहे. माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी नवीन सरकारच्या माध्यमातून या सर्व मागण्यांकडे आणि समस्यांकडे सकारात्मक आणि सहानुभूतीपूर्वक दृष्टीने पाहिले जाईल असे आश्वासन ब्राह्मण महासंघाला यानिमित्ताने दिलेले आहे. ब्राह्मण महासंघाने कोथरूड पुणेचे आमदार म्हणून श्री चंद्रकांत दादा पाटील यांना पाठिंबा देण्याचे स्पष्ट केलेले आहे. तसेच हे करत असताना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे की श्री चंद्रकांत दादा पाटील यांची सकारात्मक भूमिका तसेच एकूणच राज्याच्या हितासाठी त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे आणि महायुतीला पाठिंबा दर्शवला आहे.  

महाराष्ट्र राज्यामध्ये ब्राह्मण समाज एकूण लोकसंख्येच्या चार ते पाच टक्के इतका आहे. या समाजाला मजबूत राजकीय वजनाच्या माध्यमातुन कोणताही आधार नाही. आता अशी शक्यता आहे की श्री चंद्रकांत पाटील यांच्या रूपात ब्राह्मण महासंघाच्या पदाधिकाऱ्यांना एक चांगलं चांगला राजकीय आधार प्राप्त होऊ शकतो. तसेच श्री चंद्रकांत दादा पाटील यांनीही त्यांच्या काही वैयक्तिक गोष्टींवर या निवडणुकांच्या निमित्ताने प्रकाश टाकलेला आहे, ज्यामध्ये त्यांनी एका ट्विटर व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्ट केले आहे की त्यांची पत्नीही या समाजातील आणि पुण्यामधील आहे. एकत्रितपणे अशा सर्व घटकांचा विचार केला तर श्री चंद्रकांत दादा पाटील हे निश्चितच ब्राह्मण समाजाच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी आणि  समस्यांवर तोडगे काढण्यासाठी प्रयत्न करू शकतील. श्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या सकारात्मक आणि विश्वासार्ह दृष्टिकोनामुळे ब्राह्मण महासंघाच्या नकारात्मक दृष्टिकोन आता पाठिंब्याच्या स्वरूपात बदलून गेला आहे.

Comments

Popular posts from this blog

First Melava at Kothrud for the Election

Polite Appeal to Vote through a Twitter Video

New Inning—A Great Beginning