कृषी क्षेत्रातील सर्व घटकांना त्यांच्या कार्याकडे एक मिशन या दृष्टीने पाहण्याची गरज
महाराष्ट्राचे कृषिमंत्री माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी राहुरी कृषी विद्यापीठ येथे जॉइंत अग्रेस्को या संशोधनपर कार्यक्रमाला उपस्थिती लावली. या कार्यक्रमादरम्यान श्री चंद्रकांत दादा पाटील म्हणाले की जर आपल्याला राज्यातील शेतकऱ्यांना सुखी, समृद्ध, सुरक्षित झालेले पाहायचे असेल तर कृषी क्षेत्रासाठी काम करणाऱ्या सर्वच घटकांनी एकत्रित पणे त्यांच्या कामाकडे एक मिशन या दृष्टिकोनामधून पाहणे गरजेचे आहे . माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी कृषी संशोधन आणि विकास समिती यांच्या 47 व्या बैठकीला उपस्थिती लावली. या बैठकीचे आयोजन महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषद यांच्यातर्फे करण्यात आले होते, तसेच पुणे आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी कृषी विद्यापीठ यांचाही यामध्ये सहभाग होता. माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील यांना प्रमुख पाहुणे म्हणून या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले होते. तसेच या कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख अतिथीमध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर ...