कृषी क्षेत्रातील सर्व घटकांना त्यांच्या कार्याकडे एक मिशन या दृष्टीने पाहण्याची गरज
महाराष्ट्राचे कृषिमंत्री माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी राहुरी कृषी विद्यापीठ येथे जॉइंत अग्रेस्को या संशोधनपर कार्यक्रमाला उपस्थिती लावली. या कार्यक्रमादरम्यान श्री चंद्रकांत दादा पाटील म्हणाले की जर आपल्याला राज्यातील शेतकऱ्यांना सुखी, समृद्ध, सुरक्षित झालेले पाहायचे असेल तर कृषी क्षेत्रासाठी काम करणाऱ्या सर्वच घटकांनी एकत्रित पणे त्यांच्या कामाकडे एक मिशन या दृष्टिकोनामधून पाहणे गरजेचे आहे.
माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी कृषी संशोधन आणि विकास समिती यांच्या 47 व्या बैठकीला उपस्थिती लावली. या बैठकीचे आयोजन महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषद यांच्यातर्फे करण्यात आले होते, तसेच पुणे आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी कृषी विद्यापीठ यांचाही यामध्ये सहभाग होता. माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील यांना प्रमुख पाहुणे म्हणून या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले होते. तसेच या कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख अतिथीमध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर के पी विश्वनाथ, तिन्ही विद्यापीठांचे कुलगुरू डॉक्टर विलास भाले, डॉक्टर अशोक चव्हाण, आणि डॉक्टर संजय सावंत हे उपस्थित होते. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला श्री सचिन डवले, श्री महेंद्र वारभुवन, डॉक्टर शरद गडाख, डॉक्टर हरिहर कौसडीकर इत्यादी उपस्थित होते.
या कार्यक्रमादरम्यान श्री पाटील यांनी असे मत व्यक्त केले की कृषी क्षेत्रातील सर्व घटकांनी एकत्रितपणे काम करणे गरजेचे आहे, तसेच त्यांच्या कार्याकडे एक मोठे मिशन या दृष्टिकोनातून पाहिल्यास शेतकऱ्यांचे जीवन निश्चितच सुखी, आनंदी, सुरक्षित ,आणि समृद्ध होण्यास मदत होईल. ते पुढे म्हणाले की शास्त्रज्ञ आणि कृषी क्षेत्रातील इतर तज्ञांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे, त्याचप्रमाणे या विषयांमध्ये विविध कृषी विद्यापीठे, संस्था यांचेही योगदान महत्त्वाचे असणार आहे. कारण त्यांच्या योगदानामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात वाढलेले दिसून येते. या कार्यक्रमादरम्यान महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या 13 प्रजातींचे वाण, 17 यंत्रणा आणि 189 सूचना यांना मान्यता दिली गेली.
श्री चंद्रकांत पाटील म्हणाले की इथून पुढे शेती व्यवसायासाठी फक्त पारंपरिक पद्धतीवर अवलंबून न राहता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होणे आवश्यक आहे. बऱ्याचदा शेतकऱ्यांना पेरणीच्या निर्णयांमध्ये अचूक अंदाजासाठी तंत्रज्ञानाची आवश्यकता भासते. विक्रमी उत्पादनाच्या बाबतीत आपली बाजार पद्धती कमी पडते .त्याचप्रमाणे भविष्यात गट शेती या प्रकारातून अधिक उत्पन्नाची शक्यता निर्माण होईल.
माननीय सचिव श्री एकनाथ डवले हे म्हणाले की कृषी क्षेत्रातील संशोधन ही एक अखंड चालणारी प्रक्रिया आहे. विविध कृषी विद्यापीठांना पुढील पाच ते दहा वर्षांचा रोडमॅप शेतकऱ्यांसाठी तयार करण्यासाठी आत्ता संशोधनाची गरज आहे. त्याचप्रमाणे अशा यंत्रणा आणि साधने यांची निर्मिती केली गेली पाहीजे याद्वारे शेतकऱ्यांना त्यांची कामे आणि उत्पन्न या दृष्टीने जास्तीत जास्त फायदा होईल. माननीय श्री महेंद्र वारभुवन म्हणाले की महाराष्ट्रातील सर्व कृषी विद्यापीठे उत्कृष्टपणे संशोधनात्मक कार्य करीत आहेत, त्याचप्रमाणे इतर संस्था आणि तज्ञांनी ही शेतकऱ्यांच्या हितासाठी अधिक कार्य एकत्रितपणे करण्याची गरज आहे. कुलगुरू डॉक्टर के पी विश्वनाथ म्हणाले की कृषी विद्यापीठांचे कार्य हे शेतकऱ्यांना विविध गोष्टींसाठी मार्गदर्शन करणे आहे. त्याचप्रमाणे कृषी विद्यापीठांचा संशोधनात्मक कार्याचा शेतकऱ्यांच्या शेतीमधील विविध निर्णयासाठी फायदा होत असून त्यामुळे अधिक उत्पन्न आणि उत्पादन या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा कृषी विद्यापीठांचा मानस आहे.
माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी या कार्यक्रमादरम्यान कृषी क्षेत्रातील विविध घटकांना प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे त्यांनी केलेले आवाहन याद्वारे या विविध घटकांनी कृषी क्षेत्राकडे एक मिशन म्हणून पाहिले पाहिजे आणि या क्षेत्राच्या तसेच शेतकऱ्यांच्या उन्नतीचा एकत्रितपणे विचार केला पाहिजे हे खरोखरच रास्त आहे आणि या पद्धतीने जर विचार प्रक्रिया सुरु झाली तर त्याचा फायदा निश्चितच कृषिक्षेत्राला होईल. अशा पद्धतीच्या विचार धारणेमुळे या क्षेत्रात उल्लेखनीय क्रांती भविष्यात होऊ शकेल.
Comments
Post a Comment