पुणे- कोथरूड मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता


महाराष्ट्राच्या निवडणुका 21 ऑक्टोबरला जाहीर  झालेल्या आहेत आणि त्यानुसार अनेक राजकीय पक्ष त्यांच्या निवडणुकांच्या तयारीच्या अंतिम टप्प्यामध्ये सध्या व्यस्त आहेत. बीजेपीनेही महाराष्ट्रामध्ये महाजनादेश यात्रा नुकतीच पूर्ण केलेली आहे. त्याचप्रमाणे निवडणुकांच्या दृष्टीने अनेक धोरणे बीजेपीने आखलेली आहेत. कालच बीजेपीने एका नवीन मास्टरस्ट्रोक या माध्यमातून सर्वांना धक्का दिलेला आहे आणि ती बातमी होती बीजेपी अध्यक्ष महाराष्ट्र श्री चंद्रकांत दादा पाटील हे कोथरूड पुणे या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता स्पष्ट होत आहे. या बातमीला सर्वच माध्यमांनी अनेक कारणांसाठी खूप महत्त्व दिलेले दिसून येते.

यापूर्वी अशी चर्चा रंगली होती की श्री चंद्रकांत दादा पाटील येत्या विधानसभा निवडणुकांसाठी कोल्हापूर जिल्ह्याची निवड करतील. परंतु ऐन मोक्याच्या वेळी श्री चंद्रकांत दादा पाटील यांच्यासाठी बीजेपीने अधिक सुरक्षित अशा कोथरूड मतदार संघाची निवड केल्याचे स्पष्ट होत आहे. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष श्री शरद पवार यांनी श्री चंद्रकांत दादा पाटील यांच्यावर अशी टीका केली होती की ते लोकांच्या सहभागातून निवडून आलेले प्रतिनिधी नाहीत आणि त्यांना निवडणुकांच्या माध्यमातून निवडून येण्याचे आवाहनही केले होते. आता श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी या टीकेला चोख प्रत्युत्तर दिल्याचे दिसून येत आहे तसेच पुणे कोथरूड विभागाचे आमदार म्हणून त्यांची नियुक्ती होण्याची दाट शक्यता आहे, कारण कोथरूड पुणे हा पुणे शहरातील बीजेपीचा बालेकिल्ला मानला जातो.
या बातमी बरोबरच दुसरीही संवेदनशील बातमी अशी हाती आली की कोथरूडच्या विद्यमान आमदार सौ मेधा कुलकर्णी या निर्णयामुळे खुश नाहीत. त्यांची माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील यांच्यासोबत या निर्णयासंदर्भात बैठक झाली. या बैठकीनंतर श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी अशी माहिती दिली की सौ मेधा कुलकर्णी यांनी श्री चंद्रकांत दादा पाटील यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्यासाठी सहकार्य करण्याचे करणार असल्याचे सांगितले आहे. त्याचप्रमाणे बीजेपीने श्री चंद्रकांत दादा पाटील यांच्यासाठी सौ मेधा कुलकर्णी यांचा मतदारसंघ निवडल्यामुळे एक प्रकारे सौ मेधा कुलकर्णी यांना त्यांनी केलेल्या पाच वर्षाच्या कार्यकाळात केलेल्या मोठ्या कामाची पोचपावती मिळालेली आहे.
तसेच श्री चंद्रकांत दादा पाटील पुढे म्हणाले की एखाद्या उमेदवाराची नियुक्ती निवडणुकांच्या माध्यमातून पाच वर्षाच्या कार्यकाळासाठी होत असते. जर त्यानंतर पक्षाने या व्यक्तीविरुद्ध काही निर्णय घेतला तर त्या व्यक्तीला उदास वाटणे स्वाभाविक आहे, माणूस म्हणून त्याला वाटणाऱ्या नैराश्याच्या भावना समजल्या जाऊ शकतात. परंतु याचा अर्थ हा नाही की ही व्यक्ती पक्षाच्या तत्त्वांना आणि पक्षाच्या धोरणांच्या विरोधात काम करेल. अशाप्रकारे श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी सौ मेधा कुलकर्णी यांची बाजू मांडलेली आहे आणि अपेक्षा व्यक्त केलेली आहे की आगामी निवडणुकांच्या माध्यमातून त्यांना त्यांचे मोठ्या प्रमाणात सहकार्य प्राप्त होईल.
श्री चंद्रकांत पाटील यांचा राजकीय कारकीर्द अत्यंत चमकदार आणि प्रगतिशील राहिलेली आहे. त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदचे कार्यकर्ते म्हणून अनेक वर्ष कार्य केलेले आहे. त्यानंतर त्यांनी बीजेपीसोबत काम केले  तसेच 2014 मध्ये ते महाराष्ट्राच्या कॅबिनेट मध्ये अनेक विभागांचे मंत्री म्हणून नियुक्त झाले. मागच्या 5 वर्षांच्या काळामध्ये त्यांनी पुणे, कोल्हापूर, आणि जळगाव जिल्ह्याची जबाबदारी पालकमंत्री म्हणून देखील यशस्वीरीत्या सांभाळली. यापूर्वी पदवीधर मतदारसंघातून ते निवडून आलेले आहेत आणि आता कोथरूड, पुणे मतदार संघाच्या माध्यमातून ते पुन्हा एकदा निवडणुकांच्या प्रक्रियेत भाग घेत आहेत. लोकसभा निवडणुकांच्या दरम्यान त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची राहिलेली होती आणि म्हणूनच आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांच्याकडून अपेक्षा वाढलेल्या आहेत. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अशी त्यांची झालेली निवड ही बीजेपीच्या निवडणूक धोरणांचा भाग असल्याचे निदर्शनास येते. आता बीजेपीच्या किती निवडणूक धोरणांना प्रत्यक्षात यश मिळते हे येणारा काळच ठरवेल.

Comments

Popular posts from this blog

Auto-Rickshaw Journey in Election Campaign

Dussehra Festival Special—8th October 2019

New Inning—A Great Beginning