श्री चंद्रकांत दादा पाटील यांची भूमिका आणि जबाबदारी


चंद्रकांत दादा पाटील हे महाराष्ट्राच्या राजकारणातील नेहमीच एक जमिनीवर पाय असणारे आणि संवेदनशील राजकारणी म्हणून ओळखले जातात. लोकसभा निवडणुकादरम्यान त्यांची भूमिका राज्यामध्ये अत्यंत महत्त्वाची राहिली होती आणि त्यांनी ह्या भूमिकेला शंभर टक्के न्याय त्यांच्या कार्याच्या माध्यमातून दिलेला आहे. या सर्व गोष्टींचा विचार करता आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये श्री चंद्रकांत दादा पाटील यांची भूमिका महत्त्वाची असणार आहे ज्यामध्ये प्रामुख्याने विविध धोरणांचा अवलंब संघटन, बीजेपीचा प्रचार, कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करणे ,आणि मतदारांशी संपर्क इत्यादींचा समावेश असेल.

या ब्लॉगच्या माध्यमातून आम्हाला श्री चंद्रकांत दादा पाटील यांची भूमिका आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विशद करायला आवडेल. श्री चंद्रकांत दादा पाटील यांना नुकतेच बीजेपी महाराष्ट्र अध्यक्ष म्हणून नियुक्त केले आहे आणि तत्पूर्वी पुणे जिल्ह्याचे पालक मंत्री म्हणूनही त्यांची नियुक्ती झालेली आहे. हे दोन्ही निर्णय विधानसभा निवडणुकांना लक्षात घेऊनच घेतले गेले होते. श्री चंद्रकांत दादा पाटील यांचे पुणे जिल्ह्यातील कार्य आणि प्रतिष्ठा अविस्मरणीय आहेत आणि त्यामुळेच त्यांना लोकसभा निवडणुकादरम्यान बारामती मोहिमेवर नियुक्त केले होते. या मोहिमेदरम्यान त्यांनी पुणे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांबरोबर सुसंवाद वाढवून तसेच मतदारांशी चांगले संबंध प्रस्थापित केले होते. या मोहिमेदरम्यान त्यांनी विविध कार्यकर्त्यांना जबाबदाऱ्यांचे वाटपही केले होते. शेवटी दुर्दैवाने बारामती लोकसभा निवडणूक बीजेपीला जिंकता आली नाही परंतु तरीही राष्ट्रवादी काँग्रेसला देखील निवडणूक थोडी जड गेली असे म्हणावे लागेल. या निवडणुकीदरम्यान श्री पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे आवाहन दिले आणि अशीही चर्चा रंगली होती की बीजेपीच्या उमेदवार सौ कांचन ताई कोण कुल या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सौ सुप्रिया सुळे यांना या निवडणुकीमध्ये हरवू शकतात.
या निवडणुकांनंतर श्री चंद्रकांत दादा पाटील यांना त्यांच्या निवडणुकांच्या कामांमधील प्रामाणिक मेहनतीसाठी आणि पद्धतशीर दृष्टिकोनासाठी नेहमीच नावाजले गेले. पुढे पालकमंत्री गिरीश बापट यांची खासदार म्हणून नियुक्ती झाल्यामुळे  पुण्याचे पालकमंत्रिपद ही जागा रिकामी झाली होती. बीजेपीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी श्री चंद्रकांत दादा पाटील यांची नियुक्ती या पदी केली. श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी देखील या पदाला 100% न्याय दिला तसेच त्यांची पुणे प्रतीची भूमिका पुण्यातील नैसर्गिक आपत्ती, पूर, भिंत पडण्याची दुर्घटना आणि अनेक प्रसंगादरम्यान दिसण्यात आली.
चंद्रकांत पाटील यांनी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून अत्यंत उत्साहात काम सुरू करून अनेक प्रकल्पांना  जिल्हाधिकारी आणि अधिकाऱ्यांबरोबर बैठका घेऊन गती दिलेली आहे. त्यांची कामाची पद्धती पुण्याच्या नागरिकांनाही अतिशय आवडलेली आहे आणि त्यामुळे पुण्यातील अनेक अपूर्ण प्रकल्प लवकरच पूर्णत्वास येतील अशी अपेक्षा आहे ज्यामध्ये प्रामुख्याने पुणे मेट्रोचा समावेश होतो.
त्यानंतर श्री पाटील यांची नियुक्ती महाराष्ट्राचे बीजेपी प्रमुख  अशी झाली. त्यांच्या चाळीस वर्षाच्या राजकारणाच्या प्रगल्भ अनुभवामुळे या पदासाठी ते निश्चितच योग्य व्यक्ती ठरतात. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेसाठी त्यांनी घेतलेली मेहनत तसेच भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रामध्ये वाढवण्यात आणि मजबूत करण्यात त्यांचा असलेला सिंहाचा वाटा या गोष्टी येथे प्रामुख्याने नमूद कराव्या लागतील. जेव्हा श्री चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती बीजेपी महाराष्ट्राचे अध्यक्ष अशी झाली तेव्हा तज्ञांचे असेही मत होते की हा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस संपवण्यासाठी घेण्यात आलेला आहे. तसेच लोकसभा निवडणुकांदरम्यान त्यांची महत्त्वाची भूमिका आणि धोरणांची अंमलबजावणी तसेच निवडणुकांमध्ये प्राप्त झालेल्या अभूतपूर्व यश यामुळे श्री चंद्रकांत दादा पाटील यांना बीजेपी महाराष्ट्र अध्यक्ष या पदाचा माध्यमातून पक्षाने एक प्रकारे पोचपावती दिली असे म्हणावे लागेल.
श्री पाटील यांची बीजेपी महाराष्ट्र अध्यक्ष ही नियुक्ती कोल्हापूर जिल्ह्यासाठी निश्चितच अभिमानाचा विषय ठरते. कोल्हापूरच्या इतिहासात कोणत्याही राजकारणी व्यक्तीचा प्रवास अशा पद्धतीचा दिसत नाही. आता श्री चंद्रकांत दादा पाटील विधानसभा निवडणुकांसाठी कोथरूड पुणे मतदार संघाच्या माध्यमातून पुन्हा एकदा सज्ज आहेत. येथील नागरिकांकडून त्यांना सकारात्मक प्रतिसाद प्राप्त होत आहे आणि लोकांच्या अपेक्षाही त्यांच्याकडून आता उंचावलेल्या आहेत. 21 ऑक्टोबरला महाराष्ट्रातील निवडणुका आहेत तर 24 ऑक्टोबरला निकालाच्या माध्यमातून पुन्हा एकदा सर्व चित्र स्पष्ट होईल. एक गोष्ट निश्चित आहे की श्री. चंद्रकांत दादा पाटील यांना कोथरूड-पुणेच्या माध्यमातून एक नवीन संधी प्राप्त झालेली आहे ज्याद्वारे ते या भागासाठी येथील लोकांसाठी आणि शहरासाठी विविध कामे पार पाडू शकतात.


Comments

Popular posts from this blog

First Melava at Kothrud for the Election

New Inning—A Great Beginning

Vidhan Sabha Election Planning