विद्यार्थी आणि शास्त्रज्ञ यांसोबत लक्षणीय भेट


महाराष्ट्राच्या निवडणुकांना आता थोडाच अवधी बाकी आहे आणि या दरम्यान सर्वच राजकीय पक्ष निवडणूक प्रचारामध्ये आणि मोहिमांमध्ये व्यस्त आहेत. राज्यात आचारसंहिता लागू झाल्यामुळे या सर्व गोष्टींवर मर्यादा आहेत तरीही बीजेपी नेते  आचार संहितेच्याच्या मर्यादेत राहून त्यांची निवडणूक मोहीम आणि जनसंपर्क यशस्वीपणे वाढवत आहेत. मागच्याच आठवड्यात बीजेपीच्या उमेदवारांची यादी काही महत्त्वाच्या बदलांसह जारी झाली, यातील एक विशेष गोष्ट अशी होती की श्री चंद्रकांत दादा पाटील यांना कोथरूड पुण्याचे उमेदवार म्हणून घोषित केले आहे. त्यानुसार श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी निवडणूक मोहिमेला आणि भेटीगाठी यांना कोथरूड परिसरामध्ये सुरुवात केलेली आहे. तसेच त्यांना  या संदर्भात जनतेकडून सकारात्मक प्रतिक्रिया आणि प्रतिसाद  प्राप्त होत आहे, त्यामुळे निश्चितच कामासाठी ऊर्जा आणि बळ प्राप्त होते.

श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी नेहमीच चांगल्या शैक्षणिक सुविधांचा पुढाकार केलेला आहे. त्यांच्या कोल्हापूर जिल्ह्यातील पालकमंत्री या कारकीर्दीमध्ये ही त्यांनी जिल्ह्यातील विविध विद्यार्थ्यांबरोबर शैक्षणिक कार्यक्रम, सहल अशा माध्यमातून संवाद साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांचे असे मत आहे की आजचे विद्यार्थी हे भविष्यातील ह्यूमन कॅपिटल आहेत आणि जेव्हा देशाच्या विकासाचा संदर्भ येतो तेव्हा या कॅपिटलचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. सध्या कोथरूड-पुणे येथील निवडणूक मोहिमेअंतर्गत श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी विविध क्लब, मंडळे, सोसायटी, संस्था यांना भेटी दिल्या आहेत, तसेच श्री पाटील यांनी प्राधान्याने या परिसरातील शैक्षणिक संस्था, महाविद्यालय यांना भेटी देऊन तेथील विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक यांच्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला आणि महत्त्वपूर्ण सूचनाही या घटकांकडून ऐकल्या.
नुकतेच श्री पाटील यांनी सिम्बॉयसिस इन्स्टिट्यूटचे संस्थापक श्री शांताराम बळवंत मुजुमदार यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. ही एक दिलखुलास भेट होती जेव्हा या दोघांमध्ये शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींवर चर्चा झाल्या. सिम्बॉयसिस इन्स्टिट्यूट म्हणजे पुणे परिसरातील एक मोठा ब्रँड असून एक अत्यंत नावाजलेला शैक्षणिक ग्रुप अशी या संस्थेची  ख्याती आहे.
त्यानंतर श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी खंडेराय प्रतिष्ठानच्या ज्ञानसागर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, बालेवाडी या संस्थेला ही सदिच्छा भेट दिली. या भेटी संदर्भातील फोटो आणि ट्विट त्यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर पोस्ट केलेले आहेत. ते म्हणतात की या संस्थेच्या विद्यार्थ्यांनी ज्या पद्धतीने श्री  पाटील यांचे स्वागत केले त्यामुळे ते भारावून गेले. पारंपारिक मराठी पद्धतीने श्री पाटील यांचे उत्साहात स्वागत त्यावेळी करण्यात आले. तसेच या भेटीदरम्यान श्री पाटील यांचे विद्यार्थी आणि संस्थेच्या इतर घटकांसोबत सुसंवाद झाला ज्याद्वारे श्री पाटील यांनी महत्त्वाची माहिती आणि समस्या जाणून घेण्याचा घेण्याचा प्रयत्न केला.  
श्री चंद्रकांत पाटील हे नेहमीच समाजातील बुद्धिजीवी वर्गाचा आदर करतात. त्यांच्या याच विचार प्रक्रियेमुळे त्यांनी महान शास्त्रज्ञ श्री रघुनाथ माशेलकर यांची ही भेट त्यांच्या घरी जाऊन घेतली. या भेटीदरम्यान दोघांमध्ये अनेक विषयांवर छान संभाषण आणि अनौपचारिक संवादही झाला. यावेळी श्री माशेलकर यांनी श्री पाटील यांना आशीर्वाद आणि शुभेच्छा दिल्या.
श्री चंद्रकांत दादा पाटील यांचा विद्यार्थी आणि समाजाच्या बुद्धीजीवी वर्गासाठी असणारा सर्वसमावेशक दृष्टिकोन निश्चितच प्रशंसनीय आहे. श्री पाटील हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सक्रिय सदस्य जवळपास दोन दशकं होते आणि त्यामुळे ते समाजातील विद्यार्थी घटकांच्या समस्या योग्य रीतीने समजू शकतात. त्यांचे  अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने बरोबर असणारे चांगले संबंध तसेच त्यांनी केलेले कार्य यामुळे ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये अतिशय लोकप्रिय आहेत. श्री पाटील यांनी महान शास्त्रज्ञ श्री रघुनाथ माशेलकर यांची भेट घेऊन त्यांना शास्त्र आणि तंत्रज्ञान याविषयी वाटणारा आदर यानिमित्ताने प्रतीत केलेला आहे. आम्ही आशा करतो की श्री दादा पाटील यांना या निमित्ताने या भेटीच्या माध्यमातून या सर्व घटकांच्या द्वारे उपयुक्त माहिती प्राप्त झाली असेल, ज्याद्वारे त्यांना या घटकांच्या समस्या सोडवण्यात यश प्राप्त होईल.

Comments

Popular posts from this blog

First Melava at Kothrud for the Election

Polite Appeal to Vote through a Twitter Video

New Inning—A Great Beginning