संपर्क आणि प्रचार कार्यालयाचे सुतारवाडी-कोथरूड येथे उद्घाटन


महाराष्ट्राचे बीजेपी प्रमुख आणि महसूल मंत्री श्री चंद्रकांत दादा पाटील यावेळी कोथरूड पुणे मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवत आहेत. यापूर्वी श्री पाटील यांनी  पुणे पदवीधर मतदार संघाच्या माध्यमातून निवडणूक लढवलेली आहे. यादरम्यान श्री पाटील खूप मोठ्या प्रमाणात निवडणूक मोहिमेमध्ये कोथरुड आणि पुणे  परिसरामध्ये व्यस्त आहेत. नुकतेच त्यांचे संपर्क कार्यालय आणि प्रचाराचे कार्यालय याचे उद्घाटन सुतारवाडी या कोथरूडमधील परिसरात खासदार श्री संजय काकडे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमादरम्यान श्री संजय काकडे  यांनी असे प्रतिपादन केले की कोथरूडमधील नागरिक खरंच सुदैवी आहेत  कारण त्यांना माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील यांच्यासारखे नेतृत्व लाभले आहे.

या आठवड्यात खासदार श्री संजय काकडे यांनी श्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या संपर्क आणि प्रचार कार्यालयाचे उद्घाटन सुतारवाडी,कोथरूड येथे केले. या कार्यक्रमादरम्यान श्री चंद्रकांत दादा पाटील, सौ मेधा कुलकर्णी, श्री श्याम देशपांडे, श्री आबा सुतार, अनेक नगरसेवक आणि या परिसरातील नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.
या उद्घाटन कार्यक्रमप्रसंगी खासदार श्री संजय काकडे यांनी श्री चंद्रकांत दादा पाटील यांची दिलखुलास स्तुती केली. ते म्हणाले की श्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या राजकीय कारकीर्दीला अनेक वर्षांच्या अनुभवाचे कोंदण लाभलेले आहे, तसेच ते महाराष्ट्रातील महत्त्वाच्या विभागांचे प्रमुख असून सध्या बीजेपी महाराष्ट्राचे अध्यक्षही आहेत. कोथरूड मतदारसंघ हा अशा प्रकारच्या अनुभवी तज्ञ आणि विश्वासार्ह नेतृत्वाच्या हाती जाणे ही खूप चांगली गोष्ट आहे. श्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या नेतृत्व शैलीमुळे कोथरूड भागाचे परिवर्तन सकारात्मक दृष्टीने होईल. तसेच गेल्या 40 वर्षांपासून जी विकास कामे झालेली नाहीत अशा कामावरही लक्ष केंद्रित केले जाईल. या कार्यक्रमादरम्यान त्यांनी कोथरूडमधील मतदारांची ही स्तुती केली आणि ते म्हणाले की कोथरूडमधील मतदार परिसराच्या विकासासंदर्भात जागरूक आहेत आणि त्यांना  स्वतःची विकासाची दृष्टी ही आहे. या सर्व कारणांमुळे श्री संजय काकडे यांना असे पूर्णपणे वाटते की श्री चंद्रकांत दादा पाटील ही निवडणूक मोठ्या फरकाने जिंकणार आहेत.

श्री चंद्रकांत पाटील यांनी कोथरूड पुणे परिसरांमध्ये त्यांच्या निवडणूक मोहिमेला उत्साहात सुरुवात केलेली आहे. सध्या ते विविध कार्यक्रम, सभा, रोड शो तसेच विविध क्लब,सामाजिक संस्था, महाविद्यालय इत्यादींना भेटी देताना दिसतात. त्यांना त्यांच्या मोठ्या चाहते वर्गाचा आधार आणि पाठिंबा आहे अशा कार्यक्रमादरम्यान ही गोष्ट प्रकर्षाने जाणवते. तसेच श्री पाटील त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर त्यांच्या रोजच्या कार्यक्रमांची माहिती देताना आढळतात. त्यांच्या पूर्णपणे व्यस्त कार्यक्रमामुळे एक गोष्ट लक्षात येते की या निवडणुकीसाठी ते मोठ्या प्रमाणात मेहनत घेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षांनी कोथरूड मतदारसंघांमध्ये स्वतःचा उमेदवार दिल्यामुळे श्री पाटील यांची यांचे अर्धे काम अगोदरच झालेले आहे आणि हा सामना आता फक्त मनसेचे उमेदवार आणि चंद्रकांत दादा पाटील यांच्या मध्ये असणार आहे. महाराष्ट्र राज्याच्या निवडणुका येत्या 21 ऑक्टोबर रोजी आहेत तर निकाल 24 ऑक्टोबरला जाहीर होईल. येत्या 24 ऑक्टोबरला कोथरूडच्या नवनिर्वाचित आमदाराबरोबरच या परिसराचे भवितव्य साकारले जाईल.


Comments

Popular posts from this blog

Auto-Rickshaw Journey in Election Campaign

Dussehra Festival Special—8th October 2019

New Inning—A Great Beginning