कार्यकर्ता संवाद--संघटनेची शक्ती


बीजेपीला नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रम आणि योजना सुरू करण्याचा इतिहास लाभलेला आहे. अशीच एक अभिनव मोहीम बीजेपीने ट्विटरच्या माध्यमातून सुरु केलेली आहे, जीचे नाव आहे कार्यकर्ता-कर्ताधर्ता  आणि या मोहिमेमागील मुख्य उद्दिष्ट बीजेपीच्या सर्व कार्यकर्त्यांना सन्मानित करणे हे आहे. या मोहिमेअंतर्गत बीजेपीच्या सर्व प्रमुख नेत्यांनी त्यांच्या ट्विटर पेजला कार्यकर्ता-कर्ताधर्ता टॅगलाईन वापरलेली आहे. या योजनेअंतर्गत बीजेपीच्या सर्व कार्यकर्त्यांना सन्मानित आणि प्रोत्साहित करून त्यांच्या महत्वपूर्ण योगदानाबद्दल बीजेपीच्या सर्व वरिष्ठ नेत्यांनी त्यांना एक प्रकारे पोचपावती दिलेली असे म्हणावे लागेल.

महाराष्ट्राचे बीजेपीचे अध्यक्ष आणि माननीय महसूलमंत्री श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी या मोहिमेअंतर्गत ट्विटरवर काही व्हिडिओज पोस्ट केलेले आहेत. त्यांच्या पहिल्या व्हिडिओमध्ये त्यांनी या मोहिमेचे उद्दिष्ट आणि विचारधारा जी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नेतृत्व शैली आणि विचार धारणेतून साकार झालेली आहे याविषयी स्पष्टीकरण दिलेले आहे. तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये श्री पाटील हे राजकारणातील महिलांचा सहभाग आणि त्यासाठी देण्यात येणारे प्रोत्साहन याविषयी बोलताना दिसतात. तर पुढच्या व्हिडिओमध्ये श्री पाटील यांनी संघटनेची शक्ती तत्वे स्पष्ट केलेली आहेत आणि या लेखाच्या माध्यमातून आम्ही त्याविषयी अधिक भाष्य करणार आहोत.  
या तिसऱ्या व्हिडिओमधून श्री पाटील संघटनेच्या विविध गुणधर्मां विषयी बोलताना दिसतात. श्री पाटील यांच्या मते संघटना नेहमीच विविध व्यक्तींची बनलेली असते, ज्या व्यक्ती वेगवेगळ्या गावांमधून, समाजामधून ,आणि परिस्थितीमधून आलेल्या असतात. परंतु या विविधतेमध्येच कोणत्याही संघटनेची ताकद समाविष्ट असते. संघटनेत समाविष्ट असलेल्या सर्व सदस्यांचे दृष्टिकोन,मते, आणि विचारधारणा विविध असू शकतात. परंतु जेव्हा एखाद्या विशिष्ट समस्येविषयी उत्तर शोधायचे असते तेव्हा या सर्व सदस्यांना एकत्रितपणे या समस्येवर तोडगा काढणे आवश्यक ठरते. तसेच या उत्तराला सर्व सदस्यांची संमतीही आवश्यक असते आणि संघटनेतील सदस्यांमध्ये या उत्तराविषयी आणि त्याच्या वापराविषयी एकमत असणे आवश्यक आहे.  
 श्री चंद्रकांत पाटील पुढे म्हणतात की प्रत्येक व्यक्तीची विचारधारणा "व्यक्ती तितक्या प्रवृत्ती" या नियमानुसार वेगवेगळी असू शकते, तसेच प्रत्येकाला  स्वतःची ताकद आणि दोष माहित असतात. जगामध्ये कोणीच परिपूर्ण नाही आणि कोणत्याही संघटनेला तिच्या सदस्यांना त्यांच्या सर्व गुणधर्मांसहित आणि दोषांसहित मान्य करावे लागते. परंतु त्याचवेळी संघटनेच्या नेत्यांचे उद्दिष्ट हे संघटनेतील सदस्यांना संघटनेच्या अनुरूप आणि विचार धारणेनुसार आकार देणे हे असले पाहिजे. जितक्या लवकर संघटनेचे सदस्य अशा पद्धतीने संघटनेच्या तत्त्वांना विकृत करतील तितक्या लवकर विविध उपक्रमांमध्ये संघटनेला यश प्राप्त होईल आणि सदस्यांमध्ये याविषयी वाद विवाद राहणार नाहीत.  
श्री पाटील व्हिडीओमध्ये शेवटी म्हणतात की कोणत्याही संघटनेचे कार्य सदस्यांच्या दृष्टिकोनाला, विचार धारणेला ,आणि मतांना आदर देऊनच केले गेले पाहिजे आणि म्हणूनच चर्चा-संवाद यांची भूमिका संघटनेच्या अंतिम निर्णयांमध्ये महत्त्वाची ठरते.
माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील हे महाराष्ट्रातील बीजेपीचे एक महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत. त्यांनी पश्चिम आणि दक्षिण महाराष्ट्र मध्ये बीजेपीची पाळेमुळे रुजवण्यात  महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. श्री चंद्रकांत दादा पाटील हे एक परिपूर्ण नेते राहिले असून त्यांच्या नेतृत्व शैलीमुळे बीजेपीचे सक्षमीकरण महाराष्ट्रात झालेले आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून संघटनेच्या सक्षमीकरण याविषयी विविध मुद्यांवर भाष्य त्यांनी केलेले आहे. तसेच संघटनेच्या सर्व सदस्यांना त्यांच्या गुणदोषांसहित स्वीकारून नव्या तत्वांबरोबर त्यांची सांगड घालण्याचा प्रयत्न करावा ही विचारधारणा निश्चितच प्रशंसनीय आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून श्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या परिपूर्ण विचारप्रणालीचा अनुभव येतो ज्यामुळे ते महाराष्ट्रातील अनुभवी, तज्ञ ,आणि महत्त्वाचे बीजेपीचा आधारस्तंभ म्हणून ओळखले जातात.

Comments

Popular posts from this blog

First Melava at Kothrud for the Election

New Inning—A Great Beginning

Vidhan Sabha Election Planning