जातीय वाद आणि स्थानिक-बहिस्थ या घटकांपलीकडे विचार करण्याचे आवाहन


 महाराष्ट्रामध्ये निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे आणि त्याचबरोबर राज्यातील राजकीय समीकरणे सतत बदलत आहेत. नुकताच एक मोठा बदल महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात दिसून आला ज्याद्वारे श्री चंद्रकांत दादा पाटील यांना कोथरूड-पुणे या मतदारसंघातून येत्या विधानसभा निवडणुका लढवण्याची संधी मिळालेली आहे आणि ही संधी त्यांना बीजेपीच्या वरिष्ठ गोटातून प्राप्त झालेली आहे.

या बातमीनंतर लगेचच एक संवेदनशील बातमी आली की श्री चंद्रकांत दादा पाटील जर मूळचे कोल्हापूरचे आहेत तर ते पुण्यामधून निवडणुका का लढवत आहेत आणि मग अशा प्रकारचा प्रचार समाजामध्ये आणि विविध माध्यमांमध्ये लगेच सुरू झाला. या प्रचाराला उत्तर देण्यासाठी माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ टाकलेला आहे ज्याद्वारे त्यांनी त्यांचे पुण्याशी असलेले नाते अधोरेखित केलेले आहे.
या व्हिडिओमध्ये श्री पाटील प्रामाणिकपणे असे म्हणतात की ते पुण्याचे आहेत, तसेच ते महाराष्ट्राचे आहेत आणि ते संबंध देशाचेही आहेत. खऱ्या राजकीय नेत्याला अशाप्रकारची कोणतीच सीमा नसते. खूप लोकांना माहिती नसेल परंतु जेव्हा श्री पाटील यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेसाठी काम सुरू केले तेव्हा त्यांची कर्मभूमी पुणे शहर होती, जिथे त्यांनी दहा वर्षापेक्षा जास्त काळ काम केले. त्यांना पुणे शहराची, पुणे शहरातील लोकांची, आणि त्यांच्या समस्यांची पूर्णपणे जाणीव आहे. ते पुणे शहरासाठी कोणी बहिस्त व्यक्ती नाहीतच तर पदवीधर मतदारसंघाचे  लोकनियुक्त उमेदवार ते होते आणि ज्याद्वारे त्यांनी पुणे शहराच्या माध्यमातून बारा वर्षे काम केले आहे, तसेच मागच्या सहा महिन्यांपासून ते पुणे शहराचे पालकमंत्री ही आहेत.
पुढे श्री पाटील यांनी आपल्या आयुष्यातील वैयक्तिक गोष्टींचाही संदर्भ याबाबतीत दिलेला आहे. ते म्हणतात की मी पुणे शहराचा जावई आहे. माझी पत्नी सौ अंजली चंद्रकांत पाटील उर्फ अंजली दत्तात्रय खरे ही पुणेकर असून  त्यांचे कुटुंबीयही पुण्यामध्येच राहत होते, परंतु सध्या तब्येतीच्या कारणामुळे त्यांना कोल्हापूरला नेण्यात आलेले आहे. पुढे श्री पाटील म्हणतात की  त्यांचे अनेक नातेवाईक पुण्यात राहात असून त्यांचे मेहुणेही बिबबेवाडी  परिसरात राहतात.
यानंतर श्री चंद्रकांत पाटील म्हणतात की कोणी पुण्याचा नाही आणि म्हणून त्याला कोथरूड-पुण्यामधून लढण्याची संधी मिळू नये अशा प्रकारची विचारधारणा पूर्णपणे चुकीची आहे. महाराष्ट्र राज्याला अनेक महान व्यक्तिमत्वे, स्वातंत्र्यसैनिक, समाज सेवक यांची समृद्ध परंपरा लाभलेली आहे ज्यांनी जातीय वाद आणि स्थानिक बहिस्त अशाप्रकारच्या घटकांपलीकडे विचार करण्याची शिकवण आपल्याला दिलेली आहे. अशा पद्धतीचे वर्गीकरण निश्चितच देशासाठी घातक आहे. महाराष्ट्राला महात्मा फुले, शाहू महाराज, सावित्रीबाई फुले, वीर सावरकर, डॉक्टर आंबेडकर अशा अनेक विचारवंतांची परंपरा लाभली आहे आणि त्यांची तत्वे आणि विचारधारणा आपल्याला आपल्या वागणुकीतून जोपासली पाहिजे.
या व्हिडिओच्या शेवटी श्री. पाटील म्हणतात की पुणे कोथरूड भागामध्ये विविध विकासाची कामे हाती घेण्यासाठी ते योग्य व्यक्ती असतील, तसेच त्यांच्या राजकीय वजनाचा परिणामही या शहराच्या विविध विकास कामांसाठी निश्चितच होईल. शेवटी श्री. पाटील यांनी लोकांना या व्हिडिओद्वारे आवाहन केलेले आहे की त्यांना कोथरूड-पुणे येथून आमदार होण्याची एक संधी मतदारांनी आपल्या मतांच्या माध्यमातून द्यावी.
श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी पोस्ट केलेला व्हिडिओ अत्यंत प्रामाणिक आणि आणि पारदर्शक वाटतो. त्यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्या कोथरू- पुणे लढवण्याच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. त्यांची पुणे शहराबरोबर चांगली केमिस्ट्री आहे आणि त्यांच्या राजकीय वजनाच्या माध्यमातून पुणे शहराच्या विकासाची अनेक कामे हाती घेतली जातील. आशा आहे की लोकांना श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी स्थानिक-बहिस्थ अशा प्रकारच्या वर्गीकरण आणि जातीय वादा पलीकडे विचार करण्याचे केलेले आवाहन पटेल आणि त्यानुसार कृती केली जाईल.

Comments

Popular posts from this blog

Vidhan Sabha Election Planning

पुणे- कोथरूड मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता

First Melava at Kothrud for the Election