गणेशोत्सवादरम्यान टोल माफीचा निर्णय
सार्वजनिक बांधकाम मंत्री माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी या वर्षीच्या गणेशोत्सवादरम्यान मुंबई मधून कोकणात प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांसाठी टोलमाफीचा मोठा निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयाचा फायदा जे प्रवासी कोल्हापूरमार्गे कोकणात प्रवास करणार आहेत त्यांना 30 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर 2019 च्या दरम्यान टोल माफीच्या माध्यमातून होईल. या निर्णयामुळे चाकरमान्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळालेला असून एक मोठी खुशखबर त्यांना गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मिळालेली आहे.
सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी नुकतीच एका बैठकीला उपस्थिती लावली होती. सदर बैठकीदरम्यान येत्या गणेशोत्सवाच्या धरतीवर विविध रस्त्यांच्या दुरुस्त्या आणि कामे इत्यादींचा आढावा घेण्यात आला. या बैठकीदरम्यान हा टोल माफीचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला उच्च शिक्षण आणि तांत्रिक शिक्षण मंत्री श्री विनोद तावडे, शालेय शिक्षण मंत्री श्री आशिष शेलार, राज्यमंत्री श्री रवींद्र वायकर, राज्यमंत्री गृह ग्रामीण श्री दीपक केसरकर, आमदार श्री वैभव नाईक, रस्ते विकास विभाग सचिव श्री सी पी जोशी, सार्वजनिक बांधकाम विभाग सचिव श्री अजित सगणे आणि राष्ट्रीय महामार्ग अधिकारी श्री देशपांडे उपस्थित होते.
या बैठकीदरम्यान श्री चंद्रकांत दादा पाटील म्हणाले की या वर्षी झालेल्या प्रचंड पावसामुळे रस्त्यांची स्थिती पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण भागांमध्ये अत्यंत बिकट झालेली आहे. या परिस्थितीमध्ये गणेशोत्सवासाठी कोकणात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना गैरसोय होऊ नये यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग या रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे तत्परतेने पार पाडत आहे. त्याचबरोबर रस्ते विकास आणि दुरुस्ती यासाठी आवश्यक त्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत. श्री पाटील यांच्या मते कोकणामध्ये अनेक चाकरमानी कोल्हापूरमार्गे प्रवास करतात त्यांना सोयीस्कर प्रवासाच्या दृष्टीने राज्य सरकारने मुंबई-कोल्हापूर मार्गावर कोकणात प्रवेश करणाऱ्या चाकरमान्यांना गणेश उत्सवाच्या दरम्यान टोल माफीचा माफीचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे श्री पाटील यांनी माहिती दिली की मुंबई-गोवा हायवेचे कामही प्रगतिपथावर आहे आणि पावसाळी परिस्थिती सुधारल्यानंतर या कामाला अधिकच गती मिळेल. त्याचप्रमाणे अधिकाऱ्यांना या रस्त्यांवर जंक्शन बोर्ड, रोड स्ट्रीप, स्पीड ब्रेकर, गतिरोधक शहर आणि गावांच्या नावांचे बोर्ड उभारण्याविषयी सूचना देण्यात आलेल्या आहेत.
सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री चंद्रकांत पाटील यांनी गणेशोत्सवादरम्यान कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना टोल माफीच्या निर्णयातून एक आश्चर्याचा सुखद धक्का दिलेला आहे. यावर्षी पूर्व परिस्थितीमुळे कोकण विभाग आणि पश्चिम महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणात हानी झालेली आहे. अशा स्थितीमध्ये राज्य सरकारने पूरग्रस्तांसाठी विविध उपाय-योजनांच्या माध्यमातून आधार दिलेला आहे. कोकणामध्ये गणेश उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. या पवित्र उत्सवासाठी मुंबई आणि इतर शहरांमधून मोठ्या प्रमाणात गणेश भक्त कोकणात दाखल होतात. माननीय महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी या गणेश भक्तांना टोलमुक्त प्रवासाच्या माध्यमातून आणि रस्ते सुधारणांच्या माध्यमातून या गणपती उत्सवासाठी एक छान भेट दिलेली आहे असे म्हणता येईल.
Comments
Post a Comment