महाजनादेश यात्रा -- एक आशादायक आरंभ
2019 च्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये महाजनादेश यात्रेला सुरुवात झालेली आहे. या यात्रेची धुरा माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, माननीय महसूलमंत्री श्री चंद्रकांत दादा पाटील ,आणि बीजेपीचे अनेक वरिष्ठ नेते सांभाळत आहेत. माननीय महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या 2019 लोकसभा निवडणुकांमधील यशामुळे त्यांच्या वरील जबाबदारी आणि अपेक्षा अधिकाधिक वाढलेल्या दिसून येतात.
सध्या चंद्रकांत दादा पाटील हे निवडणूक मोहिमांमध्ये अत्यंत व्यस्त आहेत. निवडणूक मोहिमांसाठी प्रिंट मीडिया आणि सोशल मीडिया या दोन्हींचा वापर प्रचारासाठी मोठ्या प्रमाणावर केला जात आहे आणि महसूल मंत्री ह्याला अपवाद नाहीत. नुकतेच श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर महाजनादेश यात्रेविषयी काही ट्विट पोस्ट केले आहेत. काही दिवसांपूर्वीच श्री चंद्रकांत दादा पाटील यांची नियुक्ती महाराष्ट्र बीजेपीचे अध्यक्ष म्हणून झाली आणि या नियुक्तीच्या अनुषंगाने त्यांनी पोस्ट केलेले ट्विट हे अधिक महत्त्वाचे आणि संदर्भयुक्त ठरतात. लोकसभा निवडणुकांमध्ये पश्चिम महाराष्ट्रासाठी मोठ्या आघाडी सांभाळल्यानंतर येत्या राज्य निवडणुकांमध्ये त्यांच्याकडे अधिक जबाबदारी असणार आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. श्री पाटील यांची नियुक्ती पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नुकतीच झालेली आहे आणि या नियुक्तीला ही आगामी निवडणुकांच्या दृष्टीने अधिक महत्त्व प्राप्त होते.
श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंट वर एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे. या व्हिडिओद्वारे येत्या निवडणुकांमध्ये नेत्रदीपक यश संपादन करण्याचे बीजेपीचे मजबूत इरादे स्पष्ट होतात. या व्हिडिओमध्ये बीजेपीच्या विविध ख्यातनाम व्यक्तींचा आणि बीजेपीने साध्य केलेल्या विविध उद्दिष्टांचा आणि विकास कार्यांचा समावेश आहे.
2019 लोकसभा निवडणुकांमधील मोठ्या यशामुळे कार्यकर्ते आणि नेते यांच्या मनोबलामध्ये वाढ झाली असून या सकारात्मक वातावरणाचा फायदाही आता पक्षाला मिळत आहे.
चंद्रकांत पाटील यांनी ट्विटर व्हिडिओमध्ये नमूद केले आहे की आता पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होत आहे आणि या काळामध्ये विविध विषयांना हात घालून अनेक निर्णय घेण्यात, अनेक कार्ये पूर्णत्वास नेण्यास सरकारला यश मिळालेले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे राज्य सरकारला मराठा आरक्षण मागणी पूर्ण करण्यात मोठे यश मिळाले आहे. त्यांनी पुढे असेही म्हटले आहे की विरोधी पक्षांना हे सरकार पाच वर्षे पूर्ण करेल असे कधीच वाटले नव्हते, परंतु आज फडणवीस सरकार पाच वर्षाची शानदार टर्म पूर्ण करीत आहे.
आदरणीय श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी राज्य सरकारच्या मराठा आरक्षणाच्या निर्णयावर अधिक भर त्यांच्या ट्विटरद्वारे दिलेला दिसतो, कारण मराठा आरक्षण ही या सरकारने पूर्ण केलेली सर्वात मोठी आणि प्रलंबित मागणी होती.
राज्यात सध्या महाजनादेश यात्रेची आखणी निवडणूक मोहिमेअंतर्गत करण्यात आलेली आहे. या मोहिमेचा दुसरा उद्देश पब्लिक रिलेशन मजबूत करून मतदारांशी संवाद साधणे हा देखील आहे. तसेच या कॅम्पेनमधून विविध बीजेपी कार्यकर्त्यांबरोबर नेत्यांचा संवाद होणे ही सुकर राहील. महाजनादेश यात्रा हे बीजेपीचे निवडणूक मोहिमेतील पद्धतशीर अस्त्र आहे. माननीय महसूल मंत्री श्री चंद्रकांत दादा पाटील यांची भूमिका या मोहिमेमध्ये मार्गदर्शक आणि महत्त्वाची राहील. नुकत्याच सुरू झालेल्या या महाजनादेश यात्रेला आम्ही आमच्या शुभेच्छा देतो.
Comments
Post a Comment