शेतकरी सन्मान भवनाचे भूमिपूजन

कृषी मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी नुकतेच कोल्हापूर येथे शेतकरी सन्मान भवनाचे भूमिपूजन केले . या प्रकल्पानुसार कृषी विभागाची सर्व कार्यालये एका कॅम्पसमध्ये एकछत्री शेतकरी सन्मान भवन या इमारतीत येणार आहेत . या प्रकल्पामुळे 52 लाख रुपये इतक्या मोठ्या रकमेची बचत कृषी विभागाच्या बजेटमध्ये होणार आहे . या इमारतीतील कार्यालये येत्या एक ते दोन वर्षात सुरळीतपणे सुरू होतील असा अंदाज आहे . माननीय कृषिमंत्री श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी माहिती दिली की शेतकरी सन्मान भवनामुळे शेतकऱ्यांच्या सुविधांमध्ये वाढ होईल आणि सुखद रीतीने कामकाज पार पाडण्यासाठी शेतकऱ्यांना मदत होईल . आत्तापर्यंत कोल्हापूर शहरामध्ये कृषी विभागाची कार्यालये विविध ठिकाणी असून या ठिकाणी काम करणे हे अत्यंत अवघड जात होते . परंतु शेतकरी सन्मान भवन या प्रकल्पामुळे सर्व कृषी विभागाची कार्यालये एकाच छताखाली येतील . या प्रकल्पासाठी 29 करोड 80 लाख रुपये निधीची उपलब्धता करण्यात आलेली असून कृषी...